लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंग  यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे

रोहनप्रीत सिंग करिअरमध्ये नवी सुरुवात करणार आहे. आता तो टीव्हीवर पदार्पण करणार आहे.

एका रिपोर्टनुसार रोहनप्रीत सिंग हर्ष लिंबाचियासोबत ‘सुपरस्टार सिंगर 3’शो सह-होस्ट करणार आहे.

नेहा कक्कर या ‘सुपरस्टार सिंगर 3’ शो ला जज करत आहे.  हे दोघे पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहे.

रिॲलिटी सिंगिंग शो ‘इंडियन आयडॉल’ मध्ये नेहा अनेक वर्षांपासून जज होती.

रोहनप्रीत सिंगने वयाच्या 3 व्या वर्षी सिंगिंगचा प्रवास सुरू केला, त्याने शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.

2007 मध्ये रिॲलिटी सिंगिंग शो ‘सा रे ग मा प लिटिल चॅम्प्स’ चा तो फर्स्ट रनर अप होता.