त्वचेच्या आरोग्यासाठी महिला पिल ऑफ मास्कचा वापर सर्रासपणे करतात.

आजवर या मास्कचे अनेक फायदे तुम्ही पहिले असतील. पण, पिल ऑफ मास्कमुळे त्वचेचे नुकसान होण्याचीही तितकीच शक्यता असते.

काही लोकांची त्वचा सेन्सिटिव्ह असते, अशावेळी जर तुम्ही पिल ऑफ मास्कचा वापर करत असाल तर त्वचेचे नुकसान होऊ शकते.

सेन्सिटिव्ह स्किन असलेल्या व्यक्तींनी वारंवार मास्कचा वापर केल्यास त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो.

ज्या महिलांची ड्राय स्किन असेल, अशा महिलांनी पिल ऑफ मास्क वापरू नये.

ड्राय स्किन असलेल्या महिलांनी पिल ऑफ मास्क वापरल्यास त्यांची त्वचा आणखीनच कोरडी पडते.

पिल ऑफ मास्कच्या अतिवापरामुळे वृद्धत्व येते.

पिल ऑफ मास्कमुळे त्वचेवर खाज सुटू शकते.

पिल ऑफ मास्कच्या अति वापरामुळे पिंपल्स येऊ शकतात.