डाळिंबाचे फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

डाळिंब या फळाचे सेवन आरोग्यासाठी प्रचंड लाभदायी आहे.

तब्येत सुदृढ राहावी, निरोगी राहावी यासाठी डाळिंबाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

डाळिंब या फळात ओमेगा फाईव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, सी, ई, के हे पोषक घटक आहेत.

डाळिंबाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच हृदयरोगापासून संरक्षण होते.

डाळिंबाच्या सेवनाने मुरुमांपासून मुक्ती मिळते, तसेच चेहऱ्यावर चमक येते.

परंतु, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल अशा लोकांनी डाळिंबाचे सेवन करणं टाळावे.

नैराश्यात असाल आणि त्याचे औषध घेत असाल किंवा कोणत्याही मानसिक आजाराने ग्रस्त असाल तर डाळिंबाचे सेवन टाळा.