प्रेग्नंसीदरम्यान खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण याचा परिणाम थेट बाळावर होत असतो.
जाणून घेऊयात प्रेग्नंसीमध्ये नेमके कोणते पदार्थ खाऊ नयेत याविषयी.
प्रेग्नंसीमध्ये अंडी खाऊ नयेत. याव्यतिरिक्त तुम्ही मासे-मटण खाऊ शकता पण ते नीट शिजवूनच खावे.
गरोदरपणात खारट पदार्थ किंवा पॅक्ड फूड खाऊ नये यातील सोडियममुळे हाय बीपीचा धोका वाढतो.
प्रेग्नंसीमध्ये अनपास्चराइज्ड डेअरी प्रॉडक्ट्स खाऊ नयेत. यातील बॅक्टेरियामुळे इंफेक्शन होऊ शकते.
फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी पपई, अननस, द्राक्ष, जांभूळ, आंबा अशी उष्ण फळे खाऊ नयेत.
चहा- कॉफीची सवय असेल तर याचे सेवन कमी करावे. याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो.
कच्ची, मोड आलेली धान्ये, गरम मसाले, अति गोड पदार्थ खाऊ नयेत. याचाही बाळावर परिणाम होऊ शकतो.
या सर्वांव्यतिरिक्त भाज्यांमध्ये फणस , कोबी, कारले इत्यादी भाज्या खाऊ नयेत.
धूम्रपान किंवा मद्यपान करू नये. याचा विपरीत परिणाम बाळावर होऊ शकतो.