आजच्या डिजिटल युगात, लहान मुलांचा स्क्रीनटाइम खूप वाढत चाला आहे.
अगदी लहान बाळांपासून ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहेत.
मोबाईल, टीव्ही, आणि टॅब्लेटसारख्या साधनांवर अधिक वेळ घालवल्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास देखील होत नाही
हा पालकांसाठी एक महत्त्वाचा विषय बनला आहे.
यामुळे आज आपण जाणून घेऊयात मुलांचा स्क्रीनटाइम कसा कमी करायचा.
मुलांचा स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी मुलांना नवीन खेळांची ओळख करून द्या.
स्क्रीन वापरण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करा, जसे एका दिवसात 1 तास.
पालकांनी सुद्धा स्क्रीनटाइम कमी करावं मुलं पालकांचे अनुकरण करतात.
मुलांना अभ्यास झाल्यावर बाहेर खेळायला पाठवा. याने मुलांचा शारीरिक विकास होईल.
संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत वेळ घालवा.
खेळा, गप्पा मारा, जेवण एकत्र बनवा त्यांच्या मित्रमंडळींना घरी बोलवा, ज्यामुळे ते सामाजिक कौशल्ये शिकतील.