हिवाळ्यात सहजपणे आपले ओठ कोरडे आणि काळे होतात.
आता ही एक सामान्य समस्या झाली आहे.
आज आपण जाणून घेऊयात ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी कोणते पदार्थ वापरू शकतो.
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून मिश्रण तयार करा.
हे मिश्रण ओठांवर लावून 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा
.
याने तुम्हाला त्वरित फरक जाणवेल.
साखर मध किंवा ऑलिव्ह तेल एकत्र करून स्क्रब तयार करा. आठवड्यातून 2-3 वेळा ओठांना स्क्रब करा.
ओठांवरचा कोरडेपणा त्वरित निघून जाईल आणि ओठ काळे देखील होणार नाही.
बीटाचा रस देखील ओठांना लावू शकता.
बिटामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे ओठांचा रंग सुधारतो.
बदाम तेलामुळे त्वचेला पोषण मिळते.