प्रोटिन्सचा उत्तम स्रोत म्हणून अंड्याकडे पाहणात येते. अंडी जशी शरीरासाठी फायदेशीर असतात तशीच ती केसांसाठी उपयुक्त ठरतात.

केसांना अंडी लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात, ज्याने केसांची वाढ उत्तम होते.

अंड्यांमुळे केसांना फाटे फुटणे बंद होते.

अंड्यामुळे केसगळती कमी होऊन केसांची चमक वाढू लागते.

पण अंडी योग्यप्रकारे केसांसाठी वापरल्यानेच त्याचा फायदा होतो.

बाऊलमध्ये अंड्याचा पिवळे बलक काढून घ्या आणि ते नीट फेटून घ्या.

पद्धत -

तयार मिश्रण केसांच्या स्काल्पवर अर्धा तास लावून ठेवा.

हलक्या गरम पाण्याने अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. अंड्याचा तीव्र वास घालविण्यासाठी माईल्ड शॅम्पूचा वापर करा.

तुम्ही अंडयांचा हेअरमास्क सुद्धा बनवू शकता.

२ अंडी बाऊलमध्ये फेटून घ्या. यात प्रत्येकी २ चमचे खोबरेल तेल आणि दही मिक्स करा.

पद्धत -

तयार मास्क ब्रशच्या सहाय्याने केसांना २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या

अंड्याचा हेअरमास्क तुम्ही आठवड्यातून २ वेळा केसांसाठी वापरू शकता. याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात.