शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य हे 4 डिसेंबरला अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये लग्नबंधनात अडकले.
त्यांचा हा लग्नसोहळा काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.
शोभिताने लग्नाच्या 4 दिवसांनंतर सोशल मिडियावर आपले फोटो शेअर केले आहेत. दोघेही या फोटोंमध्ये खूप आनंदी दिसतायत.
यावेळी तुम्ही पाहू शकता की शोभिताने गोल्डन साडी नेसली आहे. सोबत टेम्पल ज्वेलरी आणि केसात गजरादेखील माळला आहे.
नागा चैतन्यने ऑफ व्हाईट धोती कुर्ता परिधान केली आहे. दोघेही या पारंपरिक आऊटफिटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
चैतन्यकरता त्याचे वडीलही खूप खुश आहेत. त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत ही स्पेशल मोमेंट असल्याचं सांगितलंय.
लग्न झाल्यावर नागा चैतन्य आणि शोभिता हे दोघे नागार्जुनसोबत मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते.
त्यांचे या मंदिरातील व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
शोभिताच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काहीजण म्हणतायत की या सुंदर जोडीला कुणाचीही नजर ना लागो. अनेकांनी या जोडीविषयी प्रेम व्यक्त केलं आहे.