शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे शेंगदाण्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

परंतु जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्याने आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

शेंगदाणे खाण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटेही आहेत.

जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्याने वजन वाढू शकते.

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर शेंगदाणे खाणे टाळा.

मसाले किंवा खारे शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.

शेंगदाण्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरात एलर्जी वाढू शकते.

शेंगदाण्याचे अतिसेवन केल्याने त्वचेवर एलर्जी येऊ शकते.

शेंगदाण्याच्या अतिसेवनाने पचनसंस्थाही बिगडू शकते.