उन्हाळा आणि आंबा यांची जोडी अगदी घट्ट मानली जाते.  फक्त आंब्यासाठी काही जण उन्हाळ्याची वाट पाहत असतात.

चवीसोबतच आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला, तर मग फळांच्या राजाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात दुपारी घराबाहेर पडावे लागत असेल तर एक ग्लास आंब्याचा रस पिऊन बाहेर पडावे. तुम्हाला उष्णता जाणवणार नाही.

आंब्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

त्याचबरोबर आंबा खाल्याने चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.

आंब्यामध्ये भरपूर डायटरी फाइबर आढळते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि आतडी स्वच्छ करण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास आंबा वजन कमी करण्यासाठी देखील अनुकूल मानला जातो, कारण आंबा खाल्ल्याने चरबी वाढत नाही

आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटी-एक्ने आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत.

आंबे खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली चांगले काम करते. दुपारच्या जेवणानंतर आंबा खाणे फायदेशीर ठरु शकते.

चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने तुमची पचनसंस्था संतुलित राहण्याऐवजी तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी विशेषतः रात्री आंबा खाणे टाळावे.

अधिक प्रमाणात आंबा खाल्याने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबा खाऊ नका.