अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटसुष्टीपासून लांब असली तरी ती कायमच चर्चेत असते.

नवनवीन फोटोशूटमुळे, फॅशन सेन्समुळे सोनम कायमच चर्चेत राहिली आहे.

सावरिया चित्रपटातून सोनमने कलाविश्वात पदार्पण केले आहे.

सोनम नवनवीन फॅशन अगदी बिनधास्तपणे करत असते.

नुकतच सोनम कपूरचे राजेशाही थाटातील फोटोशूट चर्चेत आहे.

सोनमने हेवी डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

सोनम लूकमध्ये पूर्णपणे रॉयल दिसत आहे.

हेवी डिझायनर ड्रेसवर सोनमने साजेशी हेअरस्टाईल, सूट होणारे दागिने सुद्धा घातले आहेत.

सोनम हेवी डिझायनर ड्रेसमध्ये खूपच छान दिसत असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.