स्वयंपाक करताना किंवा जेवताना अनेकदा कपड्यांवर हळदीचे डाग पडतात.
अशावेळी हे डाग कसे काढावेत हा प्रश्न पडतो.
यासाठीच जाणून घेऊयात काही टिप्स
डाग लागलेले कपडे थंड पाण्यात बुडवून काही वेळाकरता डिटर्जंटमध्ये ठेवा.
थंड पाण्यामुळे डाग हलके पुसट होतात.
किंवा साबणामध्ये व्हिनेगर मिसळून डाग असलेल्या ठिकाणी लावा.
कपडे कोरडे होण्याची वाट पहा आणि नंतर डाग स्वच्छ धुवून टाका.
किंवा लिंबाचे थेंब हळदीच्या डागावर टाकून पाण्याने स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडा वापरुन देखील हळदीचे डाग काढले जाऊ शकतात.
या टिप्सच्या मदतीने तुम्ही हळदीचे चिवट डाग सह़ज काढू शकता.