उन्हाळा सुरू झाला असून या दिवसांमध्ये मसालेदार  पदार्थ खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते.

घरगुती उपायांनी पोटात जळजळ होण्याच्या  समस्येपासून सुटका मिळू शकते.

बडीशेपचा प्रभाव खूप थंड असतो जेवणानंतर बडीशेपचे सेवन केल्याने जळजळपासून आराम मिळतो.

उन्हाळ्यात तापमान वाढते तेव्हा काकडी आणि पपई खाल्ल्याने  शरीराला थंडावा मिळतो.

तुळस पोटातील जळजळपासून सुटका देते. तुळशीची पाने चघळल्याने अन्नाचे पचन होण्यास मदत होते.

उष्मा वाढल्यावर एक पिकलेले केळं रोज खावे. केळ्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे

अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास वेलचीचे सेवन करा वेलचीमुळे तोंडाला आणि पोटाला थंडावा मिळतो

पुदिनाच्या सेवनाने पोटाची उष्णता कमी होऊ शकते.  मसालेदार खाल्ल्यानंतर पुदिन्याचे रस प्या.

पोटातील जळजळ किंवा आग कमी करण्यासाठी थंड दूध पिऊ शकता.