तुम्हाला तुमचे दैनंदिन ऑफिस रुटीन बदलून उत्साहाने काम करायचं असेल तर जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स
दिवसाची सुरुवात योगा, मेडिटेशन आणि हेल्दी ब्रेकफास्टने करा.
तुमचे ध्येय लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजित करा. आणि त्यानुसार दिवसाचे टार्गेट सेट करा.
तुमच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि कायम नव्या ट्रेंड्सबाबत अपडेट रहा.
सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण पद्धतीने वागा. सगळ्यांशी आपल्यापरीने जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
कॉफी मिटींग्स, कॉन्फरन्सेसच्या माध्यमातून तुमचं सोशल नेटवर्क अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.
यशापेक्षा प्रामाणिक प्रयत्नांवर अधिक विश्वास ठेवा. वेळेचं नियोजन करून कामाची विभागणी करा.
वेळापत्रकामुळे आपल्या कामात अधिक सफाईदारपणा येतो. कामाची गतीही वाढते.
तुमचा ऑफिस डेस्क, कामाची जागा ही नेहमी स्वच्छ आणि सुटसुटीत असेल याकडे लक्ष द्या.
रात्री रोजनिशी लिहिण्याची सवय लावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या उणिवा, क्षमता यांचा अंदाज येऊ शकेल.