सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकन देण्यात आले आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यासाठी त्या ओळखल्या जातात.

सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी महिला दिनाचे औचित्य साधत घोषणा केली आहे.

सुधा मुर्ती या भारतातील पहिल्या महिला अभियंता मानल्या जातात. ज्यांनी टाटामध्ये अभियंता म्हणून काम केले आहे.

सुधा मुर्ती त्यांच्या साधेपणा आणि नम्रतेसाठी ओळखल्या जातात.

कांदबरी, प्रवास वर्णने, आत्मचरित्र अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

सुधा मूर्ती महिला आणि तरुणांसाठी एक प्रेरणा आहेत.