अनेकदा आपण बाळासोबत प्रवास करतो,  अशावेळी त्याची अधिक काळजी घ्यावी लागते.

त्यामुळे नक्की कोणत्या गोष्टी सोबत घ्याव्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लॉन्ग ट्रिपसाठी जात असाल तर काही अंतरावरील प्रवासानंतर थोडा वेळ ब्रेक जरुर घ्या.

प्रवासादरम्यान जर तुम्ही एखाद्या ठिकाणी स्टे करणार असाल तर बाळाला आवश्यक ते सर्व सामान तुमच्याजवळ ठेवा.

जेणेकरुन जरी रात्री त्याला भूक लागली तर त्याला तुम्ही ते द्याल याची सुद्धा काळजी घ्या.

ऋतूनुसार बाळाच्या कपड्यांची बॅग तयार करा.

प्रवासादरम्यान बाळाला कॉटनचेच कपडे घाला. त्याचसोबत त्याचे डायपर, औषधं हे सुद्धा त्याच्या बॅगेत ठेवा.    

बाळाच्या हायजीनची काळजी घेतली पाहिजे. कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.