हिवाळ्यात चहाची तलफ आणखीच वाढते. कारण चहा प्यायल्याने शरीरात ऊबदारपणा येतो.
चहामध्ये काही पदार्थ मिसळल्यास याचे फायदे नक्की वाढू शकतात.
हिवाळ्यात चहामध्ये आले टाकून प्यायल्यास पचन नीट होते, गळ्यातील खवखव दूर होते आणि इम्युनिटी सुधारते.
आले
चहामध्ये दोन वेलचीच्या पाकळ्या टाकल्यास पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.
वेलची
चहामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
दालचिनी
चहामध्ये तुळशीची 4-5 पाने टाकल्यास श्वसनासंबंधी समस्या दूर होतात. आणि ताणही कमी होतो.
तुळस
चहामध्ये पाव चमचा हळद टाकून प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. आणि सांध्याचे आरोग्यही चांगले राहते.
हळद
चहामध्ये 1-2 लवंग टाकल्यास कफ आणि घशाच्या खवखवीपासून आराम मिळतो.
लवंग
चहामध्ये साखरेऐवजी गूळ टाकल्यास चहाचे फायदे वाढतात. यामुळे एनर्जी लेव्हल आणि हिमोग्लोबिन लेव्हल सुधारते.
गूळ
चहामध्ये 2-3 काळीमिरी कुटून टाकल्यास पचनशक्ती सुधारते. आणि अन्न लवकर पचायला मदत होते.
काळीमिरी