तणाव, झोप न येणं, डीहायड्रेशन, निस्तेज त्वचा, यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात.

दीर्घकाळ स्क्रीन पाहणे आणि खराब जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याच्या समस्येने त्रास होतो.

जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात.

दुधात व्हिटॅमिन ए  असते. थंड दुधात कापूस बुडवून घ्या. डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते.

एका भांड्यात गुलाबपाणी घ्या. त्यात कापसाचा गोळा भिजवून 20 मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

भांड्यात थोडे मध आणि लिंबाचा रस मिसळा. ते त्वचेवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा.

संत्र्याचा रस हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दूर होण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. 

झोपताना डोळ्याखाली बदाम तेल लावून मालिश केल्यास काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

झोपण्यापूर्वी डोळ्याखाली त्वचेवर नारळाच्या तेलाचे काही थेंब मालिश केली तर काही दिवसांत काळी वर्तुळे निघून जातील.