खाद्यपदार्थांमध्ये प्लास्टिकमधील हानिकारक केमिकल मिसळल्याने मेटॅबॉलिझम डिसऑर्डर, लठ्ठपणा, वंध्यत्व यासारख्या समस्या उदभवतात.

प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवलेले काही पदार्थ खाल्याने आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.

कच्ची अंडी आणि त्यातील बलक कधीही प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेऊ नये.

प्रक्रिया केलेले मांस प्लास्टिकच्या डब्यात ठेऊ नये. कारण असे केल्याने केल्याने पदार्थातील पोषक द्रव्य नाहीसे होतात.

गरम सूप प्लास्टिकच्या डब्यात ठेऊ नये असे केल्याने सूपची चव बदलते.

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्याने बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो.

प्लास्टिकच्या डब्यात जास्त वेळ कोशिंबीर अथवा सॅलेड ठेवल्याने आरोग्यास हानिकारक असते.

चहा आणि कॉफीसाठी जर प्लास्टिकचे कंटेनर वापरणार असाल तर चहा आणि कॉफी थोड्या प्रमाणात थंड करून घ्यायला हवी.

पनीर पाणी सोडते. त्यामुळे पनीर प्लास्टिकच्या डब्यात ठेवल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात.

लोणची किंवा चटणी यासारख्या जास्त काळ टिकणाऱ्या वस्तू कधीच प्लास्टिकच्या डब्यात ठेऊ नये. असे केल्याने त्यांची चव बिघडते.