स्त्रियांना मोत्यांचे दागिने घालायला खूप आवडतात. लग्न समारंभात स्त्रिया या दागिन्यांना अधिक पसंती देतात.

कालांतराने मात्र, हे दागिने काळे पडण्यास सुरुवात होते आणि त्यांची चमकही नाहीशी होते.

अनेकदा चुकीच्या पद्धतीने मोत्याचे दागिने स्वच्छ केल्याने ते खराब होतात.

मोत्याचे दागिने फार नाजूक असतात. त्यामुळे ते स्वच्छ करताना योग्यरीत्या करणे गरजेचे असते.

सर्वात  महत्वाचे म्हणजे मोत्यांचे दागिने रासायनिक पदार्थाच्या संपर्कात येऊ देऊ नका.

मऊ कापड किंवा कापूस यांच्या साहाय्यानेच मोत्यांचे दागिने स्वच्छ करा.

मोत्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात डिशसोप मिक्स करून मऊ कापडाने ते पुसून घ्या.

पाण्यात बुडवून मोत्यांचे दागिने धुवू नका. असे केल्याने दागिन्यातील रेशीम धागा खराब होऊ शकतो.

मोत्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात डिशसोप मिक्स करून मऊ कापडाने ते पुसून घ्या.

धुतल्यावर पूर्ण सुकल्याशिवाय ते पॅक करून ठेऊ नका. मोत्यांच्या दागिन्यांना वर्षातून एकदा तरी पॉलिश करा.