अनेकदा कळत - नकळत पदार्थ खाताना कपड्यांवर त्याचे डाग पडतात. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे लोणचे.

विविध हॅक वापरून सुद्धा लोणच्याच्या तेलाचे हट्टी डाग निघणे कठीण असते.

अशावेळी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास कपड्यांवरील लोणच्याचे हट्टी डाग काढणे सोप्पे होईल.

त्वचेसाठी वापरली जाणारी टॅल्कम पावडर तुम्हाला लोणच्याचे हट्टी डाग काढण्यास मदत करेल.

तेलाचे डाग कपड्यांवर पडल्यास लगेचच टॅल्कम पावडर त्याजागी लावा. पावडर कपड्यांवरील तेल शोषून घेण्याचे काम करेल.

सुमारे अर्धा तास पावडर तशीच कपड्यांवर लावा. ही प्रक्रिया सुमारे २ ते ३ वेळा करा. डाग जाण्यास मदत होईल.

डिशवॉश लिक्विडमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. तयार मिश्रण १० ते १५ मिनिटे डाग लागलेल्या भागावर लावून ठेवा आणि नंतर ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा.

तुम्ही कॉर्न स्टार्चच्या सहाय्याने सुद्धा तेलाचे डाग काढू शकता. यासाठी कॉर्नस्टार्च १० ते १५ मिनिटे तेल लागलेल्या जागी लावून ठेवा.

सुकल्यानंतर स्वच्छ सुती कपड्याने किंवा वर्तमानपत्राच्या सहाय्याने डाग स्वच्छ करून घ्या.