अनेकदा भाज्या, फळं घरी आणल्या की 2-3 दिवसात खराब होतात. अशावेळी काही टीप्सचा वापर केल्यास भाज्या चांगल्या फ्रेश राहण्यास मदत होते.

हिरव्या भाज्या फ्रेश राहण्यासाठी त्या भाज्यांचे देठ तोडून ठेवावे. यामुळे ती भाजी जास्त काळ फ्रेश राहते.

कोथिंबीर फ्रेश ठेवण्यासाठी पाण्यात धुवून कपड्याने पुसून रॅप करून झिपलॉक बॅगमध्ये बंद करून ठेवावी.

खूप दिवस झाले की बटाट्याला कोंब फुटतात. ते रोखण्यासाठी त्यासोबत एक सफरचंद ठेवावे.

टोमॅटो जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याच्या देठाचा भाग खाली ठेवावा आणि खालचा भाग वर ठेवावा.

स्ट्रॉबेरी स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये व्हिनेगर मिसळून त्यामध्ये स्ट्रॉबेरी धुवावी. यामुळे स्ट्रॉबेरी स्वच्छ आणि फ्रेश होते.

बऱ्याचदा केळी काळी पडतात, अशावेळी प्लास्टिक रॅपने त्याचे मूळ रॅप कारावे. यामुळे केळी काली पडणार नाहीत.