लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. हटके ब्लाउजच्या शोधात असाल तर फॅन्सी ब्लाऊजसाठी नक्कीच तृप्ती डमरीला फॉलो करा.

जर तुम्ही फॅन्सी ब्लाऊजमध्ये कम्फर्टेबल असाल तर 'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीचे काही हटके स्टाईलचे ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करू शकता.

तृप्ती तिच्या हटके लूकने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. ती नेहमीच नवनवीन स्टाईलचे ब्लाउज साडीवर घालत असते.

तृप्तीचे हे स्लिव्हलेस ब्लाउज डिझाईन अतिशय सिम्पल आहे. वि-नेक असलेली ब्लाउज डिझाईन तुम्हाला नक्कीच एक रिच लूक देईल.

जर तुम्ही स्ट्रिप्स डिझाईन असलेल्या ब्लाऊजमध्ये कम्फरटेबल असाल तर हे नक्कीच तुम्ही ट्राय करायला हवे. कॉलेज गर्ल साठी हा पर्याय उत्तम आहे.

जर तुम्हाला ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसायचे असेल तर डीप नेक स्ट्रीप ब्लाउज घालू शकता. साध्या साडीवर हे डिझाइन खूपच छान दिसते.

ब्लाउजवर मोती असलेले डिझाइन पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या साडीवर अतिशय शोभून दिसेल.

सेमी-स्लिव्हस डिझाइन हेवी आणि साध्या अशा दोन्ही साड्यांवर अप्रतिम दिसते. यात तुम्ही खूपच स्टायलिश दिसाल.