लग्नसमारंभात महिलांना परफेक्ट आणि हटके दिसायचे असते. परफेक्ट लूकसाठी महिला विविध आऊटफिटला पसंती देतात.

हल्ली लग्न समारंभात साड्यांऐवजी डिझायनर लेहेंग्याना अधिक पसंती देण्यात येते.

लग्नसराई सुरु असल्याने बाजारात विविध प्रकारचे लेहेंगा उपलब्ध झाले आहेत.

लग्नावेळी लेहेंगा निवडताना अनेक जणींचा गोंधळ उडतो. अशावेळी तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींनी परिधान केलेले लेहेंगा ट्राय करू शकता.

एम्ब्रॉयडरी लेहंगा   हळदी समारंभासाठी तुम्ही तारा सुतारीयाचा हा डिझायनर लेहंगा ट्राय करू शकता. या लेहेंग्यावर बारीक  गोल्डन वर्क करण्यात आले आहे.

शिमरी लेहेंगा -  स्टायलिश आणि आकर्षक लूकसाठी तुम्ही शिमरी लेहेंगा ट्राय करू शकता. यासाठी तुम्ही अनन्या पांडेच्या लूकवरून आयडिया घेऊ शकता.

शिमरी लेहेंग्याचें वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास या लेहेंग्यावर भरतकाम केलेले असते. त्यामुळे हा लेहंगा अतिशय आकर्षक वाटतो.

सिल्वर लेहेंगा -  लग्नात तुम्ही सिल्वर लेहेंगा सुद्धा ट्राय करू शकता. हा लेहेंगा वेडींगसाठी अगदी उत्तम पर्याय आहे.

सिल्वर  लेहेंग्यावर तुम्ही डायमंड नेकलेस तसेच डायमंड एअररिंग्स घालू शकता.

सिल्वर  लेहेंग्यासोबत तुम्ही ट्रान्सलुसन्ट रंगाची किंवा सिल्वर रंगाची हिल्स घालू शकता.