आजी-आजोबांच्या सहवासात राहणं, त्यांच्याकडून जुन्या गोष्टी ऐकणं हा एक मजेदार अनुभव असतो

आजच्या व्यग्र जीवनशैलीत मुलांना आजी-आजोबांसोबत राहण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही.

पण आजी-आजोबांसोबत राहण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आजी-आजोबांसोबत  वेळ घालवून तुम्ही तुमचे आयुष्य अधिक समृद्ध करू शकता.

आजी-आजोबांसोबत राहून मुलांना त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळते. त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेतात.

वडिलधाऱ्यांच्या पाया पडणे, देवाची नित्य प्रार्थना करणे या सगळ्या गोष्टी मुलं आजी-आजोबांकडून शिकतात.

आजी-आजोबांसोबत वेळ घालवून मुले आपले विचार मांडतात. यामुळे त्यांना एक मित्र मिळतो.

जेव्हा पालक  मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, तेव्हा आजी-आजोबा ती पोकळी भरून काढतात.

आजी-आजोबा सांगतात त्या कथा, त्यांनी सांगितलेल्या कवितांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.