बहुतेकांच्या घरी मनीप्लांट असते. परंतु हिवाळ्यात मनीप्लांटची पाने लवकर पिवळी पडू लागतात.

केवळ पानेच नाहीत तर मुळेही खराब होऊ लागतात.त्यात बुरशी वाढू लागते.

अशा परिस्थितीत हिवाळ्यात मनीप्लांटची नेमकी काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊयात.

 मनी प्लांटमध्ये चहाची पाने  किंवा प्लांट फूड टाका जे या झाडांची वाढ करण्यास उपयुक्त आहे.

याशिवाय खत म्हणून एप्सम मीठ, तांदळाचे पाणी, केळीची साल आणि अंड्याची कवच पावडर टाकू शकता.

जर तुम्हाला मनीप्लांटच्या मातीत ओलावा वाटत असेल तर त्यात पाणी घालणे टाळा.

माती पूर्णपणे कोरडी होईपर्यंत त्यात पाणी घालू नका आणि घालायचेच असेल तर केवळ पाणी शिंपडा.

एक स्प्रे बाटली घेऊन त्यात पाणी भरा. आता या पाण्यात एक चमचा खोबरेल तेल घाला.

तुम्ही ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल, बदाम तेल किंवा चमेलीचे तेल देखील घालू शकता.

मनी प्लांटच्या पानांवर हे मिश्रण स्प्रे केल्यास पानांना ताजेपणा आणि चमक येते.