थंडी वाढताच अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण पसरू लागते.

गाड्यांचा धूर आणि मोठमोठ्या कंपन्यांतून निघणाऱ्या धुरामुळे सगळीकडे वायू प्रदूषण वाढू लागते.

मात्र, या प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो.

अशावेळी फुप्फुसांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

तुमच्या नियमित आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. फुप्फुसांसाठी संत्री, लिंबू या पदार्थांचे सेवन करा.

दररोज नियमित व्यायाम करा, यामुळे आरोग्य व्यवस्थित राहते.

घराच्या परिसरात झाडे लावा, झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.