आयुर्वेदामध्ये आपल्या आरोग्याबाबत अनेक लाभकारी गोष्टी सांगितल्या जातात.

या आयुर्वेदिक औषधांच्या वापराचा कधीही आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागत नाही.

आयुर्वेदात फक्त आरोग्यच नव्हे कर सौंदर्यासाठी फायदेशीर बाबीही सांगण्यात आल्या आहेत.

तुळशीलादेखील आयुर्वेदात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

तुळशीच्या वापराने अनेक त्वचाविकार दूर होतात, यासाठी तुळशीच्या पानांना उकळून त्याची पेस्ट त्वचेवर लावावी.

आवळ्याला देखील आयुर्वेदात सौंदर्यवर्धक मानले जाते.

आवळा केसांसोबतच त्वचेसाठीदेखील गुणकारी आहे. दररोज आवळ्याचा रस पिणं उत्तम मानले जाते.

हळदीलाही आयुर्वेदात मोठे महत्त्व प्राप्त आहे. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील हळदीचा वापर केला जातो.

चमकदार त्वचेसाठी गुलाब जलचा देखील प्रामुख्याने वापर केला जातो.

आयुर्वेदात कोरफडीला देखील सौंदर्यवर्धक मानले जाते.