घरहिवाळी अधिवेशन 2022भगवती, डॉ. आंबेडकर रुग्णालय होणार सुसज्ज; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

भगवती, डॉ. आंबेडकर रुग्णालय होणार सुसज्ज; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

Subscribe

भगवती व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. तेथे अत्याधुनिक सुविधा नाहीत. मुंबई उपनगरातील ही महत्ताची रुग्णालये आहेत. वसई, विरार येथून येथे नागरिक उपचारासाठी येतात. अन्यथा रुग्णांना केईएम किंवा नायर रुग्णालयात जावे लागते, असा मुद्दा आमदार प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

नागपूरः भगवती व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. येत्या दोन महिन्यात त्यासाठी नियोजन केले जाईल. यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.

भगवती व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. तेथे अत्याधुनिक सुविधा नाहीत. मुंबई उपनगरातील ही महत्ताची रुग्णालये आहेत. वसई, विरार येथून येथे नागरिक उपचारासाठी येतात. अन्यथा रुग्णांना केईएम किंवा नायर रुग्णालयात जावे लागते, असा मुद्दा आमदार प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांच्या दुरवस्थेबाबत विधानसभेतही चर्चा झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयांसाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे जाहिर केले आहे. मात्र आमदार दरेकर यांनी भगवती व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाबाबत मुद्दा मांडल्याने त्यासाठी आजच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सुचना दिल्या जातील. या रुग्णालयांच्या सुधारणेसाठी दोन महिन्याचे नियोजन केले जाईल व निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

या रुग्णालयात शवागर आहे. त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्याची सुधारणा केली जाणार का?, असा प्रश्न आमदार विलास पोतनीस यांनी केला. या रुग्णालयातील शवागरांच्या सुधारणेसाठीही निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

वरळी येथील कामगार रुग्णालयात दक्षता व अतिदक्षात विभाग सुरु करावा, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी केली. तुमच्या वरळीसाठी तर निधी द्यावाच लागेल. त्यामुळे वरळी येथील कामगार रुग्णालयात दक्षता व अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

तुम्ही विरोधी पक्षात आहात का?- दरेकर यांना सभापतींनी सुनावले

परळ येथील गांधी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ग्रेच्युटीचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार का, असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी केला. याची माहिती घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यावर आमदार दरेकर हे आक्रमक झाले. दोनशे कोटींचा हा घोटाळा आहे. माहिती कसली घेता, असा सवाल आमदार दरेकर यांनी केला. तुम्ही विरोधीपक्षात आहात का?. मुख्यमंत्र्यांना तुम्ही बोलू देत नाही, असे सभापती निलम गोऱ्हे यांनी आमदार दरेकर यांना सुनावले. याबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -