घरहिवाळी अधिवेशन 2022भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात मविआ आमदारांचे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारी 'दिंडी आंदोलन'

भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात मविआ आमदारांचे विधिमंडळाच्या प्रवेशद्वारी ‘दिंडी आंदोलन’

Subscribe

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर येथील एनआयटी भूखंड घोटाळा तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्या गायरान जमीन गैरप्रकाराबद्दल विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज, मंगळवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारे अनोखे ‘दिंडी आंदोलन केले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिल्डरांना विकल्या. 86 कोटींची जमीन शिंदेंनी बिल्डरांना अवघ्या दोन कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, वाशिम जिल्ह्यातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचे एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप करत विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय, अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी देखील गायरान जमिनीचे असेच वाटप केल्याचा आऱोप आहे.

- Advertisement -

हेही वाचा – My Mahanagar Exclusive : मेगा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी उद्योग खात्याने कंपनीला दिला 200 कोटींचा फायदा

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्र्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला, कधी गुवाहटीला चला… 50 द्या कुणी 82 द्या, शिंदे सरकारला द्या… भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या, सत्तारला द्या, कुणी राठोडला द्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या, भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… जनतेकडून पैसे घेणार्‍या अब्दुल सत्तार यांचा निषेध… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या आमदारांनी फुगड्या घालून सरकारचा निषेध केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून फुगड्या घालत, रिंगण करीत हे दिंडी आंदोलन सुरू झाले. सर्व आमदारांनी पांढऱ्या टोप्या परिधान होत्या. विरोधकांनी दिंडी आंदोलन करत टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा – बॉम्ब बॉम्ब म्हणणारे लवंगी फटाकाही नाही, फडणवीसांचा ठाकरे गटाला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -