घरहिवाळी अधिवेशन 2022आता पुढचं अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023ला, अजित पवारांची माहिती

आता पुढचं अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023ला, अजित पवारांची माहिती

Subscribe

विधान परिषदेचं अधिवेशन अजून संपलेलं नाही. अंबादास दानवे भेटले होते, विधान परिषद संस्थगित झाल्यानंतर मी पत्रकारांशी बोलेन, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सांगितल्याचंही अजित पवारांनी अधोरेखित केलं आहे

मुंबईः राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपुष्टात आलं असून, विधानसभेचं कामकाज संपवण्यात आलंय. विशेष म्हणजे विधान परिषदेचं कामकाजही सुरू असले तरी त्याचीसुद्धा लवकरच सांगता होणार आहे. आता विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 27 फेब्रुवारी 2023ला होणार आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. विधानसभेचं कामकाज संपुष्टात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते.

विधान परिषदेचं अधिवेशन अजून संपलेलं नाही. अंबादास दानवे भेटले होते, विधान परिषद संस्थगित झाल्यानंतर मी पत्रकारांशी बोलेन, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सांगितल्याचंही अजित पवारांनी अधोरेखित केलं आहे. नागपुरात शेवटचं हिवाळी अधिवेशन हे 2019 ला झाले. 2020 आणि 2021 ला कोरोनामुळे नागपुरात अधिवेशन झालं नाही. आता कोरोना नसल्यामुळे हे अधिवेशन झालं, हे अधिवेशन तीन आठवडे चालावं, अशी आमच्या सगळ्यांची भावना होती. 25 डिसेंबरनंतर सभागृहात उपस्थिती कमी राहील, असं वाटलं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. विरोधी पक्षांचे आमदार चांगले उपस्थित होते. त्याच पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला उपस्थिती ठेवावी लागली. उपस्थिती कमी असल्यास सत्ताधाऱ्यांना बिलं पास करायला अडचणी येतात, असा टोलाही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय.

- Advertisement -

अजून एक आठवडा अधिवेशन घ्या, अशी कामकाज समितीमध्ये आम्ही भूमिका मांडली होती. परंतु शुक्रवारी अधिवेशन संपवायचं हे त्यांनी पक्क केलं होतं. अंतिम आठवडा प्रस्ताव त्यांनी आजच्या दिवशी घेतला. अधिवेशन वाढवण्याची मागणी मान्य न करता अधिवेशन संस्थगित केलं आणि पुढचं अधिवेशन सोमवारी 27 फेब्रुवारी 2023 ला मुंबईला होणार असल्याचं सांगितलं. आम्हाला चहाला बोलावलं होतं तेव्हा आम्ही विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकतो, असं पत्र दिलं होतं. बहिष्कार टाकण्यापाठीमागचे कारणही दिले होते. सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत दोनच चर्चा झाल्या. अजून चर्चा करा, असं सांगत होतं, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बहुमताच्या जोरावर त्यांनी अधिवेशन संपवलं. चार मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचं काम आम्ही केलं. त्यासंदर्भातील पुरावे आम्ही त्यांना तिथे दाखवले, असंही अजित पवार म्हणालेत.


हेही वाचाः विरोधकांवर गुन्हे दाखल होतात, पण सत्ताधाऱ्यांना माफी…हा कुठला न्याय?; अनिल परबांचा सवाल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -