घरहिवाळी अधिवेशन 2022सीमावादावरून विरोधकांची श्रेयवादाची लढाई - प्रवीण दरेकर

सीमावादावरून विरोधकांची श्रेयवादाची लढाई – प्रवीण दरेकर

Subscribe

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्र शासीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्याला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले.

नागपूरः कर्नाटक सीमावादावरुन विरोधकांची श्रेयवादाची लढाई सुरु आहे, असा आरोप भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवारी विधानपरिषदेत केला. विरोधकांवरही त्यांनी चौफेर टीका केली.

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्र शासीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्याला प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले.

- Advertisement -

ते म्हणाले, छगन भुजबळ यांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार आहे. कारण ते सीमावादाच्या लढ्यात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नी ४० दिवस कारागृहात होते. त्यांना तर या विषयी बोलण्याचा शंभर टक्के अधिकार आहे. जे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. कधी ज्यांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खल्ल्या नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर संशय घेणे योग्य नाही. तुम्ही कधी सीमा भागात गेलात? कधी लाठ्या खल्ल्यात?, असा टोला प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला. तसेच मी लाठ्या काठ्या खल्ल्या आहेत. मला बघायला बाळासाहेब आले होते याची आठवण दरेकर यांनी करुन दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादावर आक्रमक भूमिका मांडतात. आपले मुख्यमंत्री याविषयी ब्र पण काढत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर आमदार दरेकर म्हणाले, आमचे मुख्यमंत्री ब्र नाही काढत तर ते थेट अॅक्शन घेतात. आमचे मुख्यमंत्री टोकाची भूमिका घेणारे आहेत. ठोस भूमिका घेणारे आहेत, असे आमदार दरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

आमच्याकडे होते तेव्हा त्यांनी लाठ्या काठ्या खल्ल्या. पण तिकडे गेल्यावर त्यांची भूमिका बदलली या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपालाही आमदार दरेकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, तुमच्याकडे असले की ते पवित्र आणि आमच्याकडे आले की अपवित्र होतात. ही भूमिका योग्य नाही. आता केंद्रात, महाराष्ट्रात व कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, म्हणून हा वाद होतो आहे, असा आरोप तुम्ही करत आहात. मात्र याआधी केंद्रात, महाराष्ट्रात व कर्नाटकात काॅंग्रेसची सत्ता होती. तेव्ही तुम्ही काही केले नाही. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा असतो, असा टोलाही दरेकर यांनी विरोधकांना हाणला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -