घरहिवाळी अधिवेशन 2022शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला; उद्धव व आदित्य ठाकरेंचे फोटो हटविले

शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला; उद्धव व आदित्य ठाकरेंचे फोटो हटविले

Subscribe

हिवाळी अधिवेशनात ठाकरे व शिंदे गटाला शेजारी शेजारी कार्यालय देण्यात आले होते. वाद होण्याची शक्यता लक्षात घेता शिंदे गटाला शिवसेनेचे जुने कार्यालय देण्यात आले. तर ठाकरे गटाला कार्यालयासाठी दुसरीकडे जागा देण्यात येणार आहे. शिंदे गटाने तत्काळ या कार्यालयात बदल सुरु केले. या बदलात शिंदे गटाने उद्धव व आदित्य ठाकरे यांचे फोटो उतरवले. या कार्यालयात आधी आनंद दिघे यांचा फोटो नव्हता. त्यांच्या फोटोला कार्यालयात जागा करण्यात आली.

नागपूरः हिवाळी अधिवेशनासाठी शिंदे गटाला शिवसेनेचे कार्यालय देण्यात आले आहे. कार्यालय मिळताच शिंदे गटाने तेथील उद्धव व आदित्य ठाकरे यांचे फोटो काढले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कायम ठेवत आनंद दिघे यांचा फोटो कार्यालयात लावण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना असा फलक या कार्यालयाबाहेर लावण्यात येणार आहे.

हिवाळी अधिवेशनात ठाकरे व शिंदे गटाला शेजारी शेजारी कार्यालय देण्यात आले होते. वाद होण्याची शक्यता लक्षात घेता शिंदे गटाला शिवसेनेचे जुने कार्यालय देण्यात आले. तर ठाकरे गटाला कार्यालयासाठी दुसरीकडे जागा देण्यात येणार आहे. शिंदे गटाने तत्काळ या कार्यालयात बदल सुरु केले. या बदलात शिंदे गटाने उद्धव व आदित्य ठाकरे यांचे फोटो उतरवले. या कार्यालयात आधी आनंद दिघे यांचा फोटो नव्हता. त्यांच्या फोटोला कार्यालयात जागा करण्यात आली.

- Advertisement -

आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आहेत. शिवसेनेला धक्का दिल्यानंतर भाजपला हाताशी धरुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे प्रत्येक कार्यक्रमात आनंद दिघे यांचा उल्लेख आवर्जुन करतात. आनंद दिघे यांचा फोटोही ते कार्यालयात लावतात. मंत्रालय परिसरात शिंदे गटाचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयातही आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर ठाकरे व त्यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याची मालिका शिंदे सरकारने सुरु केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे खास हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाणार आहेत. त्यामुळे शिंदे व ठाकरे यांच्यात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शिंदे व ठाकरे गटाला शेजारी शेजारी कार्यालय दिल्यास दोन्हा गटात वाद होऊ शकतो. त्यामुळे शिंदे गटाला शिवसेनेचे कार्यालय देण्यात आले आहे. तसेच ठाकरे गटाला दुसरीकडे कार्यालय दिले जाणार आहे. मात्र विरोधीपक्ष म्हणून उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळाबाहेर गर्दी केली होती.

- Advertisement -

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -