घरहिवाळी अधिवेशन 2022भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन मुलींची शाळा सुरू करा; भुजबळांची मागणी

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन मुलींची शाळा सुरू करा; भुजबळांची मागणी

Subscribe

नागपूर : पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहे. शासनाने बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. सरकारनेही त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम ९७ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना दिले.

- Advertisement -

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले आहे. शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेऊन त्याठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने 21 फेब्रुवारी 2006 रोजी ठराव क्र. 557 अन्वये ठराव मंजूर केलेला आहे आणि भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्यावतीने “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरू करण्याचा 27 नोव्हेंबर 2021 रोजी उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरू करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता आहे, असे मत भुजबळ यांनी मांडले.

यावरील उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सरकार या प्रश्नावर गंभीर असून आता तत्काळ बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच त्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्यशासन उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना भेट दिलं प्रबोधनकारांचं पुस्तक, करून दिली ‘त्या’ वादाची आठवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -