डायबिटीस असलेल्यांसाठी व्हाईट राईस की ब्राऊन राईस खाणे आहे फायदेशीर?

डायबिटीस असलेल्यांसाठी व्हाईट राईस की ब्राऊन राईस खाणे आहे फायदेशीर?

डायबिटीस असलेल्यांसाठी व्हाईट राईस की ब्राऊन राईस खाणे आहे फायदेशीर?

तांदळामध्ये (Rice) खूप पोषक तत्व असतात, जे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. पण व्हाईट राईस आणि ब्राऊन राईसमध्ये कोणता जास्त चांगला असतो? याबाबत प्रत्येकजण गोंधळलेले असतात. खरंच एक राईस दुसऱ्यापेक्षा अधिक चांगला असतो की फक्त असा समज आहे. न्यूट्रिशनिस्ट भुवन रस्तोगीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये ब्राऊन राईसबाबत काही तथ्य असणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तसेच डेली डाएटमध्ये ब्राऊन राईसचे काय फायदे आहेत हे सांगितले आहे.

न्यूट्रिशनिस्ट भुवनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सर्व व्हाईट राईस पॉलिश करण्यापूर्वी ब्राऊन असतात. विना पॉलिश केलेला राईस ब्राऊन राईसच्या नावाने विकला जातो. ब्राऊन राईस एक धान्य आहे, तर व्हाईट राईस प्रोसेस्ड असते. जेव्हा तांदळाचे दाणे पॉलिश केले जातात, तेव्हा कोंडा आणि अंकुरचा भाग काढून टाकला जातो. तांदळाच्या अंकुरच्या भागात खूप जास्त मिनरल आणि कोंड्यामध्ये खूप फायबर असते. पॉलिश केल्यानंतर व्हाईट राईसमधून फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स निघून जाते.

दरम्यान न्यूट्रिशनिस्ट भुवन म्हणाले की, १९००च्या दशकातील सुरुवातीला बेरीबेरी आजार ब्राऊन राईस तुलनेत जास्त करून व्हाईट राईस खाल्ल्यामुळे पसरला होता. कारण यामुळे लोकांमध्ये व्हिटॅमिन B1 कमी झाली होती. जास्त करून अशा लोकांमध्ये ज्यांच्या जेवनात राईस होता. त्यामुळे व्हाईट राईसच्या जागी ब्राऊन राईसला प्राथमिकता देणे हेल्थ ट्रेंड नाही.


हेही वाचा – Skin care tips : त्वचा होईल चमकदार आणि कोमल ; फॉलो करा ‘या’टिप्स


 

First Published on: December 20, 2021 3:31 PM
Exit mobile version