2022 horoscope – २०२२ मध्ये या ‘४’ राशींवर होणार लक्ष्मीची कृपा

नवीन वर्ष २०२२ सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. पण त्याचबरोबर येणार नवीन वर्ष कसं जाणार याबद्दलही आपणा सगळ्यांना कुतूहल आहे. पण ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या आयुष्यात काय घडणार हे सगळं ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं आणि २०२२ मध्ये याची प्रचिती आपल्यातील काहीजणांना नक्कीच येणार आहे. कारण नवीन वर्षात १२ पैकी ४ राशींवर लक्ष्मीची महाकृपा असणार आहे.

मेष – मेष राशीवाल्यांसाठी नवीन वर्ष विशेष असणार आहे. यावर्षी महालक्ष्मीची कृपादृष्टी मेष व्यक्तींवर असणार आहे. यामुळे मेष व्यक्तींच्या आर्थिक विवंचना तर संपतील. कर्ज फिटतील. खिशात पैसा खुळखुळणार आहे. देवाण घेवाणीचे महत्वपूर्ण व्यवहार कराल. गुंतवणूक फायद्याची ठरेल. नोकरी आणि व्यवसायात मनासारखा लाभ होईल. परदेश दौऱ्यावर जाल. लग्न जुळतील. प्रेमसंबंध सुधरतील.

सिंह- सिंह राशीवाल्यांसाठी २०२२ अतिशय शुभ वर्ष ठरणार आहे. आर्थिक संकट संपतील. संपत्तीत वाढ होईल. नवीन घर किंवा जमीनीशी संबंधित व्यवहार कराल. देवाण घेवाणीचे व्यवहार होतील. मनासारख्या घटना घडतील. प्रेम संबंध जुळतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. नातेसंबंध सुधरतील.

वृश्चिक- वृश्चिक राशीवाल्यांसाठी हे वर्ष फलदायी असेल. नवीन वाहन , घर खरेदी कराल. नवीन उद्योग सुरू कराल. पैशाचे स्त्रोत वाढतील. करियरच्या अनेक संधी समोरून येतील. प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवाल. कोर्टाची कामे होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. अपेक्षित स्थळ येतील.

मीन राशी- २०२२ हे वर्ष मीन राशीसाठी अत्यंत शुभ असेल. गुंतवणूकीतून लाभ होईल. कर्ज फिटतील. व्यापारी वर्गासाठी गुंतवणूकीचे मार्ग निर्माण होतील. नातेसंबंध सुधरतील. प्रिय व्यक्ती भेटतील. रखडलेली कामे होतील. घरात मंगल कार्य होईल.  घरात पाहुण्यांचा राबता असेल.

 

First Published on: December 17, 2021 3:02 PM
Exit mobile version