गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे कपडे का घालू नये?

गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे कपडे का घालू नये?

आपल्याकडे अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृत व्यक्तीचे कपडे घालू नयेत असं म्हटलं जातं. मग ते कपडे कितीही नवीन असले तरी ते टाकून देण्याचा सल्ला दिला जातो. पण यामागे नक्की काय कारण आहे? याची अनेकांना कल्पना नसते. आज आम्ही तुमच्या याचं शंकेचं निरसण करणार आहोत.

मृत व्यक्तीचे कपडे का घालू नये?

असं म्हटलं जातं की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी त्या व्यक्तीचे कपडे आणि त्याच्या इतर वस्तू जाळल्या पाहिजेत. कारण शरीर सोडून गेलेला आत्मा आपल्या कपड्यांच्या वासाने आणि इतर आवडत्या गोष्टींवरूनच त्याचे कुटुंब आणि घर ओळखतो. म्हणून त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तूंचे दहन केले नाही. तर मृत्यूनंतरही तो आत्मा आपल्या कुटुंबाशी असलेली आसक्ती सोडू शकत नाही आणि इकडे तिकडे भटकत राहतो. यामुळे कुटुंबातील व्यक्तींना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

वैज्ञानिकदृष्ट्या मृत व्यक्तीचे कपडे न घालण्यामागे कारण

वैज्ञानिकदृष्ट्या, अनेकदा एखाद्या गंभीर आजारामुळे व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो. अशावेळी अनेक सूक्ष्म जीवाणू आणि विषाणू त्याच्या शरीरात प्रवेश केलेला असतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही ते जीवाणू कपड्यांमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये राहतात. त्यामुळे ते परिधान करणारे कुटुंबीयही आजारांना बळी पडू शकतात.


हेही वाचा :

Ram Navami 2024 : रामनवमीला आर्वजून करा रामरक्षा स्तोत्राचे पठण

First Published on: April 16, 2024 4:50 PM
Exit mobile version