Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीReligiousAshadi Ekadashi 2023 : आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देवशयनी एकादशीला करा 'हे'...

Ashadi Ekadashi 2023 : आर्थिक समस्या दूर करण्यासाठी देवशयनी एकादशीला करा ‘हे’ उपाय

Subscribe

हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी (Ekadashi) किंवा आषाढ एकादशी म्हटले जाते. वर्षातील 24 एकादशींपैकी देवशयनी (आषाढ) एकादशी आणि देवउठनी (कार्तिक) एकादशी या 2 एकादशी खूप महत्वाच्या मानल्या जातात. यंदा 29 जून 2023 रोजी देवशयनी एकादशीचे व्रत असणार आहे.

देवशयनी एकादशीला करा ‘हे’ उपाय

  • हिंदू धर्मामध्ये देवशयनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंची कृपा होते.
  • देवशयनी एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखाने श्री विष्णूंचा जलाभिषेक करा. यामुळे देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होतील.
  • देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजेच्या दरम्यान एक रुपायाचे नाणे श्री विष्णूंच्या फोटोजवळ ठेवा. त्यानंतर पूजेनंतर हे नाणे लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा.
  • या दिवशी श्री विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करा.
  • या दिवशी भगवद्गगीतेच्या 15 व्या अध्यायाचे पठण करा.
  • एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा.
  • एकादशीला या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी सकाळी स्नान करून तुळशीच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे.

हेही वाचा :

Chaturmas 2023 : चातुर्मासात करा ‘या’ गोष्टींचे दान कुटुंबात नांदेल सुख-समृद्धी

Manini