Chaitra Navratri 2024 : कधी सुरू होणार चैत्र नवरात्री? हा आहे घटस्थापना मुहूर्त आणि तिथी

Chaitra Navratri 2024 : कधी सुरू होणार चैत्र नवरात्री? हा आहे घटस्थापना मुहूर्त आणि तिथी

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते. यंदा चैत्र नवरात्र 9 एप्रिलपासून सुरू होत असून 17 एप्रिलपर्यंत समाप्त होणार आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते. दुर्गादेवी ही सुख, समृद्धी, शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते. जे भाविक श्रद्धेने देवीची पूजा करतात त्यांवर देवीची अखंड कृपा असते.

चैत्र नवरात्री घटस्थापना मुहूर्त 

सकाळी 06:02 पासून ते सकाळी 10:16 मिनिटांपर्यंत असेल.

प्रतिपदा तिथी प्रारंभ – 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 पासून सुरू होईल.

प्रतिपदा तिथी समाप्त – 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 08:30 पर्यंत असेल.

नऊ दिवस होणार देवीच्या या रुपांची पूजा

  1. नवरात्री पहीला दिवस 9 एप्रिल 2024 मंगळवार : देवी शैलपुत्री
  2. नवरात्री दूसरा दिवस 10 एप्रिल 2024 बुधवार : देवी ब्रम्हचारिणी
  3. नवरात्री तिसरा दिवस 11 एप्रिल 2024 गुरूवार : देवी चंद्रघंटा पूजा
  4. नवरात्री चौथा दिवस 12 एप्रिल 2024 शुक्रवार : देवी कुष्मांडा पूजा
  5. नवरात्री पाचवा दिवस 13 एप्रिल 2024 शनिवार : देवी स्कंदमाता पूजा
  6. नवरात्री सहावा दिवस 14 एप्रिल 2024 रविवार : देवी कात्यायनी पूजा
  7. नवरात्री सातवा दिवस 15 एप्रिल 2024 सोमवार : देवी कालरात्रि पूजा
  8. नवरात्री आठवा दिवस 16 एप्रिल 2024 मंगळवार : देवी महागौरी, महाअष्टमी पूजा
  9. नवरात्री सातवा दिवस 17 एप्रिल 2024 बुधवार : देवी सिद्धीदात्री पूजा, महानवमी

हेही वाचा :

पूजेमध्ये इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवतेच्या पूजेचे महत्व काय?

First Published on: March 18, 2024 6:17 PM
Exit mobile version