Chanakya Niti : आयुष्यात ‘या’ व्यक्तींची कधीही मदत करू नये

Chanakya Niti : आयुष्यात ‘या’ व्यक्तींची कधीही मदत करू नये

चाणक्य नीतीचे रचनाकार आचार्य चाणक्य यांना बुद्धिमत्ता आणि वेगवेगळ्या विषयातील पारंगतेतमुळे आजही श्रेष्ठ विद्वान म्हणून ओळखले जाते. ते एक कुशल, रणनीतीकार तसेच एक महान अर्थशास्त्रीसुद्धा होते. चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली, ज्यांचा वापर आजही अनेकजण करतात. त्यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्राच्या गोष्टी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आयुष्यात या गोष्टींचा वापर केल्यास आयुष्यातील अनेक संकटांवर मात होऊ शकते.

चाणक्यांच्या मते, सफल जीवन जगण्यासाठी आयुष्यातील योग्य आणि अयोग्य व्यक्तींची निवड करणं देखील महत्त्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही आयुष्यात अशा व्यक्तींपासून सावध राहू शकता.

आयुष्यात ‘या’ व्यक्तींची कधीही मदत करु नये

मूर्खाशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च
दु:खिते सम्प्रयोगेण पंडितोऽप्यवसीदति

हा श्लोक चाणक्यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये लिहिला आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, आयुष्यात कधीही मूर्ख व्यक्ती, दृष्ट महीला आणि नकारात्मक व्यक्तींची कधीही मदत करु नये.


दृष्ट व्यक्तींपासून नेहमी लांबच राहवे. कारण हे व्यक्ती तुम्ही कितीही मदत केली तरीही त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. असे स्वार्थासाठी दुसऱ्यांसोबत गोड बोलतात आणि त्यांचा हेतू साध्य झाल्यावर पाठ फिरवतात.


चाणक्यांच्या मते, मूर्ख व्यक्ती एकच चूक दहा वेळा करतो. मूर्ख व्यक्तीला किती ज्ञान दिलं तरीही ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये.


नकारात्मक व्यक्तीं सतत वाईट विचार करतात. त्यामुळे असा व्यक्तींपासून नेहमी दूर राहावे. नकारात्मक व्यक्तींचा सहवात राहून तुमचे विचार देखील नकारात्मक होऊ शकतात.


हेही वाचा :

Chanakya Niti : या मार्गाने कमावलेला पैसा व्यक्तीला करतो कंगाल

 

First Published on: June 23, 2023 5:17 PM
Exit mobile version