देव गण, मनुष्य गण की राक्षस गण? तुमच्या गणानुसार ओळखा तुमची खासियत

देव गण, मनुष्य गण की राक्षस गण? तुमच्या गणानुसार ओळखा तुमची खासियत

ज्योतिष शास्त्रात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जन्माच्या नक्षत्रावरुन देव गण, मानुष्य गण आणि राक्षस गण या तीन गणांमध्ये विभागले आहे. या तिन्ही गणांमध्ये ‘देव गण’ श्रेष्ठ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार देव गणात जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावात देवांसारखे गुण असतात. देव गणाप्रमाणेच मनुष्य गण आणि राक्षस गणातील व्यक्तींचे देखील विशेष महत्त्व आहे.

देव गण

अश्विनी, मृगशिरा, पुर्नवसु, पुष्‍य, हस्‍त, स्‍वाती, अनुराधा, श्रवण, रेवती या नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा देव गण असतो.

ज्योतिषांच्या मते, देव गणाच्या लोकांना सर्वोत्तम मानले गेले आहे. देव गणाच्या लोकांमध्ये देवतांचे गुण असतात. हे लोक प्रामाणिक, चारित्र्यवान, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात.

मनुष्य गण

पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी, भरणी, रोहिणी, उत्तर षाढा, आर्द्रा, पूर्वषाढा, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा मनुष्य गण असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, मनुष्य गणातील लोक खूप मेहनती असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पुढे जातात आणि भरपूर पैसा कमावतात आणि जीवनात खूप सन्मान मिळवतात.

राक्षस गण

कृत्तिका, धनिष्ठा, चित्रा, मघा, आश्लेषा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचा राक्षस गण असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, राक्षस गणाच्या लोकांचे बहुतेक विचार नकारात्मक असतात. पण प्रयत्न केल्यावर ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. राक्षस गणाच्या व्यक्तींना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात. निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक परिस्थितीला जिद्दीने सामोरे जातात. हे लोक स्पष्ट वक्ते असतात.

 


हेही वाचा :

तुमचे पितर तुमच्यावर नाराज असल्याची ‘ही’ आहेत लक्षणं

First Published on: August 7, 2023 5:00 PM
Exit mobile version