Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून खरेदी करा या वस्तू

Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवर्जून खरेदी करा या वस्तू

हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. आज 9 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदीही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक मराठमोळी वेषभूषा, दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत, गोडाधोडाचा स्वयंपाक करत नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. यादरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात, या दिवशी केलेली खरेदी अनेक पटीने फळ देते.

गुढीपाडव्याला खरेदी करा या वस्तू

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोने/ चांदीचे दागिणे किंवा नाणी खरेदी करु शकता. या दिवशी सोने/ चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात, या दिवशी केलेली खरेदी अनेक पटीने फळ देते.

या दिवशी तुम्ही वाहन देखील खरेदी करु शकता. शास्त्रात वाहनाला देवीचे स्वरुप मानले जाते. शुभ मुहूर्तावर नवे वाहन घरी आल्याने घरात सुख-समृद्धी येते.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर टी.व्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू
खरेदी करणं देखील खूप लाभकारी मानले जाते.

नववर्षाच्या दिवशी तुळशीचे रोप देखील घरी आणू शकता. तुळशीचे रोप घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो.

शास्त्रात मोरपंखाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. श्रीकृष्ण, श्री गणेश , कार्तिकेय आणि इंद्रदेव यांना मोरपंख खूप प्रिय आहे. तसेच, मोराचे पंख देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या दिवशी घरी मोरपंख आणा, यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.


हेही वाचा : 

गुढीवर कलश उलटा का ठेवला जातो?

First Published on: April 9, 2024 11:08 AM
Exit mobile version