Holi 2024 : होळीच्या दिवशी म्हणून दाखवला जातो पुरणपोळीचा नेवैद्य

Holi 2024 : होळीच्या दिवशी म्हणून दाखवला जातो पुरणपोळीचा नेवैद्य

हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा 24 मार्च रोजी होळी तर 25 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात होळीच्या दिवशी होलिका दहन करण्याची जुनी प्रथा आहे. यावेळी होलिकेला नैवेद्य म्हणून महाराष्ट्रातील घरोघरी आवर्जून पुरणपोळी देखील बनवली जाते.

होळीच्या दिवशी पुरणपोळी का बनवली जाते?

पौराणिक कथेनुसार, ढुंढा नावाची एक राक्षसीण होती. जी लहान मुलांचा जीव घ्यायची. तिच्या या त्रासाला अनेकजण कंटाळले होते. यामुळे लोक तिला शिव्या देऊन वरून बोंबा मारायचे. परंतु तराही ती त्यांना दाद द्यायची नाही. तिच्या त्रासाला कंटाळालेल्या गावातील सर्व पुरुषांनी एके दिवशी सूर्यास्ताच्या वेळी आपापल्या घरून पाच गोवऱ्या, पाच लाकडे आणली आणि ती गोल रचून पेटवली आणि गावकरी ढुंढा राक्षसिणीच्या शोधात सर्वत्र बोंबा मारत, शिव्या देत हिंडू लागले.

दुसरीकडे हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा असल्याने शेतातून गहू आणि हरभऱ्याची डाळ घरोघरी आली होती. त्यामुळे घरातील स्त्रियांनी पुरण पोळी तयार केली. पुरणपोळीवर तूप, दूध,आमटी, भात, भाजी असं नैवेद्य केळीच्या पानावर अग्नीसमोर दाखवला. तिथल्या जमलेल्या पुरुषांनी अग्नि देवाला तीन प्रदक्षिणा मारल्या. हे पाहून राक्षसीण घाबरली. तिला वाटलं हे लोक आपल्याला अग्नीत भस्म टाकून मारतील म्हणून ती तिथून पळून गेली.

तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. तेव्हापासून होळीच्या दिवशी पुरण पोळी बनवली जाते तसेच ‘होळी रे होळी पुरणाची पोळी…’ अशी घोषणा दिली जाते.

 


हेही वाचा :

Holi 2024 : होळीच्या दिवशी करू नका ‘या’ चुका

First Published on: March 21, 2024 7:00 PM
Exit mobile version