२०२२ मध्ये ‘या’ राशीवाल्यांचे नशीब फळफळणार, हक्काच्या घराचे आणि गाडीचे स्वप्न पूर्ण होणार !

सौजन्य- गुगल

नवीन वर्षारंभाला अवघा एक महिना उरला असून येणारे वर्ष कसे असेल याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यातही नवीन वर्षात अनेकांची हक्काचे घर, बंगला गाडी घेता येईल एवढा पैसा कमावण्याची इच्छाही असलेच. मग बघूया तर तुमच्यापैकी कितीजणांना २०२२ फळणार आहे.

मेष- वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षाच्या सुरुवातीला शुक्र मकर राशीत प्रवेश करत आहे. शुक्र हा स्थावर संपत्तीसाठी लाभकारक आहे. यामुळे मेष राशीवाल्यांना या वर्षाच्या सुरुवातीलाच घरखरेदीबरोबरच वाहन खरेदीचा योग आहे. संपत्तीशी निगडीत प्रकरणं यावर्षी निकालात लागतील.

वृषभ- वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरणार आहे. यावर्षी वृषभ व्यक्ती जमीन, जुमला आणि वाहन खरेदीबरोबरचं सोने चांदी यासह मौल्यवान धातूंची खरेदी करतील. कुटुंब आणि मित्रमंडळीवर यावर्षी अनपेक्षित खर्च होईल. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कामाचे क्षेत्र बदलण्याचा विचार करत असाल तर तज्त्रांचा सल्ला घ्या. नाहीतर पश्चातापाची वेळ येईल.

मिथुन-मिथुन राशीच्या जातकांवर शनिची दृष्टी असल्याने हे वर्ष तुमच्यासाठी खास असणार आहे. सुख सुविधांचा सुकाळ असेल. एप्रिल महिन्यानंतर दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर गुरुच्या सप्तदृष्टीमुळे रत्न, मौल्यवान धातूंचे दागिणे, यांचबरोबर जमीन, बंगला याबरोबरच वाहन प्राप्तीचा योग आहे.

कर्क-कर्क राशीवाले डोळ्यासमोर लक्ष्य ठेवून वाटचाल करत असतात. यावर्षी त्यांचे लक्ष्य पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. घरखरेदीबरोबरच वाहनखरेदीसाठी यावर्षी उत्तम योग आहे.

सिंह- सिंह राशीवाले हुशार असतात. भविष्यासाठी योजना आखून त्याप्रमाणे जीवन जगण्याकडे त्यांचे प्राधान्य असते. यावर्षी सिंह राशीची आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. कामाच्या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी समोरून येतील. त्यातूनच आर्थिक प्रगती होईल. वाहन खरेदीसाठी उत्तम योग आहे.

कन्या- कन्या राशिवाल्यांसाठी नवीन वर्ष लाभदायक ठरणार आहे. गुरू आणि शनिची युती होत असल्याने मनाप्रमाणे काम होणार आहेत. यात बचतीची शक्यता सर्वाधिक आहे. यावर्षी मौल्यवान रत्ने, दागदागिणे खरेदीचा योग आहे. जर तुम्ही जमिनीत पैसे गुंतवू इच्छित असाल तर यावर्षाचे शेवटचे चार महिने लाभदायक ठरणार आहेत.

तूळ- तूळ राशीवाल्यांसाठी वाहन खरेदी आणि विक्रीचा चांगला योग आहे. संपत्ती खरेदी करण्याच्या अनेक संधी येतील. विचार करुन गुंतवणूक करावी. अन्यथा मनस्तापाला सामोरे जावे लागेल.

वृश्चिक-वृश्चिक राशीवाल्यांसाठी हे वर्ष फलदायी असणार आहे. घर आणि वाहन खरेदीबरोबरच अविवाहीतांसाठी लग्नाचा योग आहे. मोठे करार कराल. यश मिळेल.

धनु- धनु राशीला यावर्षी पितृक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीसाठी योग्य वेळ आहे. सरकारी कागदपत्रांवर सही करताना सावधानता बाळगा.

मकर- २०२२ वर्ष मकर राशीवाल्यांसाठी विशेष आहे. एप्रिल महिन्यात आर्थिक व्यवहार कराल. पैतृक संपत्तीची प्रकरणे निकालात लागतील.

कुंभ- हे वर्ष कुंभ राशीसाठी उत्तम आहे. आर्थिक व्यवहारात चढ उतार असला तरी पैशाची आवक वाढेल. अनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तूंची खऱेदी कराल. जमीनीसंदर्भातील व्यवहार विचार करुन करा.

मीन- संपत्ती खरेदीचे अनेक योग येतील. विचार करुन खर्च करा. उधारीपासून दूर राहा. प्रलोभनात फसू नका.

 

 

 

 

First Published on: November 29, 2021 7:41 PM
Exit mobile version