Kartik Purnima 2023 : काशीच्या देव दीपावलीचं भगवान शंकरांशी आहे खास नातं

Kartik Purnima 2023 : काशीच्या देव दीपावलीचं भगवान शंकरांशी आहे खास नातं

अश्विन अमावस्येला दिवाळी सण साजरा केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसानंतर कार्तिक पौर्णिमेला देशभरातील काही भागांमध्ये देव दीपावली साजरी केली जाते. याचं निमित्ताने कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाराणसीच्या काशीमध्ये देव दीपावलीचा महापर्व साजरा केला जातो. देव दीपावलीला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. काशीच्या देव दीपावलीचा संबंध भगवान शंकरांशी असल्याचं म्हटलं जातं.

त्रिपुरारी पौर्णिमाला काशीमध्ये असतो दिव्यांच्या झगमगाट

त्रिपुरारी पौर्णिमेला काशीमध्ये तसेच देशभरातील शंकरांच्या मंदिरांमध्ये दिवे लावण्याची प्रथा आहे. काशीमध्ये या दिवशी गंगा घाट, गल्लीत, संपूर्ण शहरात दिव्यांचा प्रकाश करण्याची प्रथा आहे. तसेच संध्याकाळी गंगा नदीची भव्य आरती केली जाते.

काशीमध्ये का साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा?

यंदा 27 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाईल. हिंदू धर्मात त्रिपुरारी पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. धार्मित मान्यतेनुसार, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी-देवता काशीमध्ये येतात आणि गंगा नदीमध्ये स्नान करुन दीपोत्सवाचा भाग बनतात.

असं म्हणतात की, या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे सर्व मनुष्य आणि देवी-देवता आनंदी झाले. सर्वांना त्रिपुरासुराच्या त्रासापासून मुक्ति मिळाली. त्यामुळे भगवान शंकरांना खूश करण्यासाठी या दिवशी सर्व देवी-देवतांनी काशीमध्ये जाऊन दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमेला काशीमध्ये देव दिवाळी साजरी केली जाते.


हेही वाचा  :

Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमेला श्री विष्णूंसोबत करा देवी लक्ष्मीची पूजा

First Published on: November 27, 2023 12:30 PM
Exit mobile version