Mahashivratri 2024 : आज महाशिवरात्रीला राशीनुसार धारण करा रुद्राक्ष

Mahashivratri 2024 : आज महाशिवरात्रीला राशीनुसार धारण करा रुद्राक्ष

यंदा महाशिवरात्री 8 मार्च साजरी केली जाईल. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करुन महादेवाचे मनोभावे स्मरण करतो. त्याच्यावर महादेव प्रसन्न होतात. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी अनेक शुभ योग तयार होतात. या शुभ योगात रुद्राक्ष धारण करणे देखील उत्तम मानले जाते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणते रुद्राक्ष तुम्ही धारण करु शकता हे सांगणार आहोत.

राशीनुसार धारण करा रुद्राक्ष

 

 

राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने त्याचे अनेक फायदे व्यक्तीला होतात. तसेच त्याच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती मजबूत होण्यास मदत होते.

मेष राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावा, हा यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे यांचे भाग्य उजळते.

या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे सर्व कार्यात यश मिळते.

कर्क राशीचा स्वामी चंद्रआहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे चंद्र ग्रह मजबूत होतो.

या राशीच्या व्यक्तींनी बारा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील.

या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे तुमची सर्व कामं पूर्ण होतील.

तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे त्यांना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

या राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे व्यक्तीला पैशांची कमतरता भासत नाही.

धनु राशीच्या व्यक्तींनी पाच मुखी रुद्राक्ष धारण करावे. या आयुष्यात यशस्वी होण्यास मदत होईल.

मकर राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिल.

कुंभ राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावे. यामुळे तुमचे आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील.

मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. या व्यक्तींनी पाच मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

 


हेही वाचा :

Mahashivratri 2024 : मंगळ, शनी दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ गोष्टी

First Published on: March 8, 2024 12:23 PM
Exit mobile version