Mahavir Jayanti 2023 : राजपटाचा त्याग करून महावीरांनी का केले 12 वर्षं कठोर तप?

Mahavir Jayanti 2023 : राजपटाचा त्याग करून महावीरांनी का केले 12 वर्षं कठोर तप?

यंदा महावीर जयंती मंगळवार 4 एप्रिल रोजी आहे. महावीर जयंती हा दिवस जैन धर्मीयांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे. भगवान महावीर यांचा अहिंसा, शुद्धता, सत्यता, शांती आणि अहिंसेवर विश्वास होता. महावीर स्वामींचा जन्म चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी इ.स.पू. 599 इ.स. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील कुंडग्राम येथे राजा सिद्धांत आणि राणी त्रिशला यांच्या पोटीच्या झाला. त्यांची जयंती महावीर जयंती म्हणून ओळखली जाते.

भगवान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर मानले जातात. त्यांचे वडील वज्जी राज्याचे राजा होते. महावीर जैन हे देखील प्रभू रामाशी संबंधित असल्याचे मानले जाते. कारण ज्या कुळात श्रीरामाचा जन्म झाला त्याच कुळात महावीर जैन यांचा जन्म झाला. भगवान राम आणि महावीर जैन हे दोघेही सूर्यवंशी आहेत आणि दोघांचाही जन्म इच्छावाकू वंशात झाला होता.

12 वर्ष केले होते कठोर तप

भगवान महावीरांच्या लहानपणीचे नाव वर्धमान होते. त्यांनी ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी कठोर तप केले. वयाच्या 30 व्या वर्षाच्या शाही सुखांचा त्याग करुन 12 वर्ष 6 महिने कठोर तप केले. तपाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या इच्छा
आणि दुर्गुणांवर नियंत्रण मिळवले आणि कैवल्य प्राप्त केले. ही कठोर तपश्चर्या केल्यामुळे वर्धमानला महावीर म्हटले गेले.

महावीर स्वामींनी कैवल्यज्ञान प्राप्त करून साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका अशी चार तीर्थांची स्थापना केली. ही सर्व तीर्थक्षेत्रे ऐहिक तीर्थे नसून तत्त्वे आहेत. यामध्ये जैन धर्म, सत्य, अहिंसा, अपिग्रह, अस्तेय ब्रह्मचर्य या तत्त्वांचे पालन करून स्वत:च्या आत्म्याला तीर्थ बनविण्याविषयी महावीर स्वामींनी सांगितले आहे.


हेही वाचा :

Hanuman jayanti 2023 : हनुमानाला ‘पवनपुत्र’ का म्हटलं जातं? जाणून घ्या जन्माचे रहस्य

First Published on: April 4, 2023 9:47 AM
Exit mobile version