Makar Sankranti 2024 : यंदा संक्रांतीला काळा रंग वर्ज्य; ‘या’ रंगाचे घाला कपडे

Makar Sankranti 2024 : यंदा संक्रांतीला काळा रंग वर्ज्य; ‘या’ रंगाचे घाला कपडे

यंदा संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल.हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांती विवाहित स्त्रियांसाठी तसेच विशेषतः नवीन लग्न झालेल्या स्त्रियांसाठी खूप खास असते. या दिवशी ववसा घेण्याची देखील प्रथा आहे.

संक्रांतीला अनेकजणी आवर्जून काळी साडी नेसणं पसंत करतात. मात्र, यावर्षी संक्रांती देवीच काळ्या वस्त्रात येणार असल्याने तो रंग वर्ज्य मानला जाईल. त्यामुळे आता यावर्षी नक्की कोणता रंग वापरायचा असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

यंदा संक्रांतीला कोणता रंग घालायचा?

या दिवशी विवाहित महिलांनी हिरव्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे. कारण, हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरवा रंग आपल्याला सुख-समृद्धी प्रदान करतो. तर लाल रंग उत्साह, पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो. त्यामुळे या रंगांचे वस्त्र तुम्ही नक्कीच घालू शकता. शिवाय याव्यतिरिक्त तुम्ही नारंगी, पिवळा, जांभळा किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र देखील घालू शकता.

यंदा काळा रंग का वर्ज्य?

यंदा देवी संक्रांतीचे मुख्य वाहन घोडा असून त्यासोबतच उपवाहन सिंह देखील आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. तसेच, तिची दक्षिण-पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे. तिने हातामध्ये भाला घेतला असून तिच्या कपाळावर हळदीचा टिळा लावलेला आहे. ती वृद्धावस्थेत येत आहे. तसेच, यावर्षी देवी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीला काळा रंग परिधान करणं वर्ज्य मानलं जाईल. खरंतर, दरवर्षी संक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो. मात्र, यंदा हा रंग वर्ज्य आहे.

 


हेही वाचा : Makar Sankranti 2024 : यंदा घोड्यावर स्वार होऊन येणार संक्रांती, पण काळा रंग असणार वर्ज्य

First Published on: January 12, 2024 7:13 PM
Exit mobile version