शनिवारपासून सुरु होतोय ‘मृत्यू पंचक’; जाणून घ्या पंचक म्हणजे काय

शनिवारपासून सुरु होतोय ‘मृत्यू पंचक’; जाणून घ्या पंचक म्हणजे काय

शास्त्रामध्ये पंचक अत्यंत अशुभ मानले जाते. हा पंचक दर महिन्याला होतो. हे पंचक राज पंचक, मृत्यु पंचक, रोग पंचक, अग्नि पंचक आणि चोर पंचक असे 5 प्रकार आहेत. पंचकातील 5 दिवसात शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. या वर्षी मे महिन्यात मृत्यू पंचक लागले आहे. असे मानले जाते की, मृत्यू पंचक काळात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर कुटुंबातील इतरांवर संकट येतात.

ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा शनिवारपासून पंचक सुरू होते, त्याला मृत्यु पंचक म्हणतात. मृत्यू पंचक 13 मे 2023 रोजी सकाळी 12:18 वाजता सुरू होईल आणि 17 मे 2023 रोजी सकाळी 07:39 वाजता समाप्त होईल.

पंचक म्हणजे काय?

ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांमध्ये, धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्र या शेवटच्या पाच नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात. या पाच नक्षत्रांचा संयोग अशुभ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत जातो तेव्हा पंचक होते.

मृत्यु पंचक मध्ये हे काम करू नका

मृत्युपंचकच्या पाच दिवसांत बांधकाम करु नये. दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे. मृत्यु पंचक अत्यंत अशुभ मानले जाते. या पंचकमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच गावातील किंवा कुटुंबातील आणखी 5 लोकांचा मृत्यू होईल, असे मानले जाते, त्यामुळे पंचकमध्ये मृत्यू झाल्यास, विशेष विधी केल्यानंतरच मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात.


हेही वाचा :

कपाळावर टिळा लावण्याचे काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

First Published on: May 12, 2023 4:23 PM
Exit mobile version