वर्षाची शेवटची संकष्टी,जाणून घ्या तिथी, शुभ योग मुहूर्त

वर्षाची शेवटची संकष्टी,जाणून घ्या तिथी, शुभ योग मुहूर्त

Sankashti Chaturthi 2023: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi

आज 30 डिसेंबर 2023 ची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. डिसेंबर २०२३ ही पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीची पूजा आणि काही विशेष उपाय केल्याने साधकाच्या प्रत्येक कार्यात त्याला यश मिळू शकते. तसेच संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर केलेली उपासना आणि नवीन कार्याची सुरुवात केल्याने यशस्वी फळ मिळू शकते. बुद्धिदाता,देवांचा देव गणेश,विनाशकारी गणपती बाप्पाचे पूजन प्रत्येकाला लाभकारक ठरते. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी गणेश पूजनासाठी खास ठरते. या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आज आहे . याबाबत तिथी, पूजा विधी व चंद्रोदय वेळ जाणून घ्या.

Sankashti Chaturthi 2023: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi

प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला फार महत्व असते. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते.या तिथीला इतर देवतांच्या आधी श्रीगणेशाची पूजा केली जाते.या दिवशीचं महत्व प्रत्येक गणेशभक्ताकडून पाळलं जातं .

दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीचे वेगळे महत्व आहे.यावर्षीची संकष्टी हे वर्ष संपताना आली असल्याने गणेशाची कृपा वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोबत राहिली आहे. सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे.मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्ट चतुर्थी शनिवार ३० डिसेंबर रोजी आहे.

संकष्टी चतुर्थी मुहूर्त नेमका कधी ?

संकष्टी चतुर्थी ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होईल आणि ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटापर्यंत राहील. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८ वाजून ३ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत आहे. संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त ६ वाजून १४ मिनिटे ते ७ वाजून ४६ मिनिटापर्यंत आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी कसा आहे ?

सूर्योदयापूर्वी उठून स्नान आणि इतर कार्य आटोपून घ्या. स्वच्छ कपडे घाला. देवपूजा करून घ्या यानंतर व्रताचा संकल्प घ्या. चौरंगावर लाल वस्त्र टाकून गणेश स्थापना करा. यानंतर दिवा, धूप, अगरबत्ती लावा. दूर्वा, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. गणपतीची आरती करा. सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन करा.वर्षाच्या शेवटी आलेली ही संकष्टी तुमच्या कामात आणि तुमच्या इच्छाशक्तीला नक्कीच बळ देईल.

First Published on: December 30, 2023 12:36 PM
Exit mobile version